भिवंडी शहर व ग्रामीण परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार आणि सुलभ प्रवासी सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाकडून भिवंडी एसटी आगारात पाच नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या नव्या बस वाहनांचा आमदार महेश चौघुले यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून शुभारंभकेला आहे. यावेळी आमदार महेश चौघुले यांनी स्वतः बस चालवण्याचा आनंद घेतला.
मागील महिन्यात नवीन पाच बस दाखल झाल्या होत्या. त्यामुळे भिवंडी बस आगारात नवीन दहा बस उपलब्ध झाल्याने प्रवाशांना चांगली परिवहन सेवा उपलब्ध होईल असा विश्वास आमदार महेश चौघुले यांनी व्यक्त केला. भिवंडी परिसरातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन नवीन एसटी बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांनी राज्य शासन तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने भिवंडी बस आगाराला दहा नवीन एसटी बस प्राप्त झाल्या आहेत.
भिवंडी एसटी आगारात पाच नवीन बस दाखल



