महावितरणच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेवा सेतू आणि सेवा संकल्प अभियानाची माहिती सर्व सामान्य वीज ग्राहकांना देण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिसरात स्टॉल लावण्यात आला आहे.
मनपा आयुक्त अभीनव गोयल आणि कोकण प्रादेशिक कार्यालय कल्याण चे सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या हस्ते या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. सर्व सामान्य माणसाला मिळणाऱ्या नागरी सुविधा अधिक सुलभ, पारदर्शी आणि गतिमान करण्यासाठी सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. वीज जोडणी, वीज देयक दुरुस्ती, स्मार्ट योजना, छतावर वीज निर्मिती करणे आदी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना दिली जाणार आहे. तसेच इच्छुक ग्राहकांचे अर्जही यावेळी भरून घेतले जाणार आहे.
मनपा आयुक्त अभिनव गोयल यांचे स्वागत महावितरणचे अधीक्षक अभियंता रवींद्र आव्हाड तर सह व्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांचे स्वागत कडोंमनपाचे प्रशांत भागवत अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) केले.
या वेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेश काळे, जितेंद्र शिंदे कार्यकारी अभियंता (विद्युत) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन सहाय्यक अभियंता स्मिता काळे यांनी केले.
कडोंमनपात महावितरणचा स्टॉल



