३५० हून अधिक महिलांनी घेतली अन्न प्रक्रिया उद्योग-व्यवसायाची माहिती

३५० हून अधिक महिलांनी घेतली अन्न प्रक्रिया उद्योग-व्यवसायाची माहिती

आमदार ॲड. माधवी नाईक यांनी घेतलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपच्या आमदार ॲड. माधवी नाईक यांनी शहरातील नवउद्योजक व बचत गटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या पहिल्याच शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे ३५० हून अधिक महिलांनी केंद्र व राज्य सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग-व्यवसायाची माहिती घेतली. तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्सूकता दाखविली.
केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना (CMFPS) आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) यांच्या माध्यमातून ३० ते ३५ टक्के म्हणजे जास्तीत जास्त १० ते ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित ‘सेवा संकल्प सप्ताह’ निमित्ताने भाजपच्या वर्तकनगर येथील कार्यालयात मंगळवारी शिबीर घेण्यात आले. या शिबिराला जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रामेश्वर पाचे, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक अभिषेक पवार, सहायक उद्योग अधिकारी मंजुषा देवरे, कृषी अधिकारी भगवान पठारे, तंत्र अधिकारी विशाल माने, एनयूएलएम’चे अधिकारी मनिष वाघमारे, समीर शहा यांच्याबरोबरच योजनांचा लाभ घेऊन उद्योग उभारलेले रंजना खानोलकर, मिहीर देसाई, लीना चौधरी, मेघजी चौधरी यांची उपस्थिती होती.

साधी गृहिणी ते उद्योजिका !
सरकारी योजनेचा फायदा घेऊन चव महाराष्ट्राची’ हा मसालाविक्रीचा व्यवसाय उभारणाऱ्या रंजना खानोलकर यांनी साधी गृहिणी ते उद्योजिकेपर्यंतचा प्रवास उलगडला. उद्योजक मिहीर देसाई यांनी मिलेट उत्पादनांच्या यशस्वी व्यवसायाची देऊन पदार्थांच्या पॅकेजिंगबाबत मार्गदर्शन करण्याची तयारी दाखविली. आवळ्यापासून ज्यूस व इतर पदार्थ तयार करून मारलेल्या भरारीबद्दल लीना चौधरी यांनी माहिती दिली. तर गिर गायीच्या तूपातून पाच कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय पोचविलेल्या मेघजी चौधरी यांनी आर्थिक प्रगतीसाठी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

Scroll to Top