दिव्यातील निसर्गोपचार तज्ज्ञ अनंत शिगवण यांना ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’

अनंत शिगवण यांना 'निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६'

दिव्यातील सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ अनंत शिगवण यांच्या निसर्गोपचार क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना ‘निसर्गोपचार गौरव सन्मान २०२६’ प्रदान करण्यात आला. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए.जी.एम.ए. आणि योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या वतीने बुलडाणा येथील भातृमंडळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
निसर्गोपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ज्ञांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून शेकडो निसर्गोपचार तज्ज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाला बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड, बुलडाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पूजा गायकवाड, डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, डॉ. प्रशांत कपाले, एमजीएम विद्यापीठाच्या योगा विभागाचे प्रमुख गंगाप्रसाद खरात आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. याशिवाय आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन नितीन पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे, दिशा चव्हाण, विजय नवल पाटील, विनोद ढोबळे, रावसाहेब घोडेगाव, रामेश्वर शिंदे, श्रीकांत अंजुटगी, भानुदास परबत, अशोक देवकर, संजय गवारे, स्मिता खारकर, राहुल देशमुख, आशिष सूर्यवंशी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. अनंत शिगवण यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल निसर्गोपचार क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिव्यातील निसर्गोपचार क्षेत्रासाठी हा सन्मान अभिमानाचा क्षण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Scroll to Top