युवक काँग्रेसने वाटले पेट्रोल पंपावर मेलोडी चॉकलेट

पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमंतीचा युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध केला. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पेट्रोल पंपावर वाहन चालकांना चक्क मेलोडी चॉकलेट वाटून सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध केला.

“आवाज महाराष्ट्राचा, ठाण्याच्या परिवर्तनाचा” या अभियानाची सुरुवात युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या वेळी शिवराज मोरे यांच्यासह राष्ट्रीय सहा सचिव शांभवी शुक्ला, उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन, प्रदेश सचिव मेहेर चौपाने, महासचिव दीपक पाठक, सचिव प्रशांत पारवे, कल्याण जिल्हाध्यक्ष जपजीत सिंह, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, कळवा मुंब्रा विधान सभा अध्यक्ष वसीम हजरत आदी उपस्थित होते. या अभियानाचा प्रारंभकरताना शिवराज मोरे यांनी भाजप सरकारच्या चुकलेल्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली.

दरम्यान, आज पेट्रोलच्या दरात 84 पैशांची वाढ झालेली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंपावर मेलोडी वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवराज मोरे यांनी, इंधनाचे दर आठवड्याला वाढत आहेत. मोदी लोकांना ऑनलाईन काम करायला सांगत आहेत. आता

पेट्रोल ऑनलाईन कसे भरायचे, हेही त्यांनी सांगावे. देशाचा आर्थिक गाडा ढासळला आहे. काळ बिकट आहे. त्यामुळेच देशात उद्रेक होणार आहे. देशावर आर्थिक संकट असताना मोदी परदेशी दौरे करून मेलोनीला मेलोडी देत आहेत. म्हणूनच आम्ही महागाईचे चॉकलेट वाटत आहोत, असे सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top