आमदार संजय केळकर यांचा पुढाकार
ठाणे महापालिका क्षेत्रातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचा शेकडो तरुण-तरुणींनी लाभ घेतला. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या सहकार्याने सहावा पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शुक्रवार, २२ मे रोजी सकाळी १० वाजता मावळी मंडळ शाळा, टेलिफोन एक्सचेंजजवळ, ठाणे येथे उत्साहात झाला.
या उपक्रमाच्या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी दहावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले शेकडो उमेदवार उपस्थित होते. वॉक इन इंटरव्ह्यूसाठी सुमारे ३० आस्थापना उपस्थित होत्या. त्यांच्यामार्फत अनेकांना तत्काळ नियुक्तीपत्रे देण्यात आली. प्रशांत जाधव यांनी या रोजगार मेळाव्याचे नियोजन केले.
यावेळी आमदार संजय केळकर यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास भाजप गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेविका उषा वाघ, नगरसेवक सुरेश कांबळे, विशाल वाघ, जयेंद्र कोळी, महिला अध्यक्ष स्वप्नाली साळवी, रक्षा यादव, योगेश भंडारी, मत्सगंधा पवार, प्रदीप जाधव, राजेश गाडे, हरी मेजार आदी पदाधिकारी आणि कायकर्ते उपस्थित होते.


