योगीधाम चौक ते सिटिपार्क रस्त्याच्या कामाची नगरसेविका अनघा देवळेकर यांनी केली पाहणी

कल्याण पश्चिमेतील योगीधाम चौक ते सिटिपार्क कडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रटीकरणाचे काम सुरु असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे काम पुर्ण होण्यासाठी शिवसेना नगरसेविका अनघा देवळेकर यांनी अधिकारी आणि, कार्यकर्ता सह पाहणी दौरा शनिवारी केला. योगीधाम चौक ते सिटिपार्क रस्त्या दरम्यान डांबरी करणाचा रस्ता होता. पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था होत होती. या रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि रस्त्याच्या दुतर्फा गटारे सुविधा होण्यासाठी नगरसेविका अनघा देळेकर यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कड्डू पाठपुरावा करीत सुमारे ८० लक्ष रू. निधी उपलब्ध करून संदर्भीत रस्त्याचा कायापालट करून नागरिकांना दिलसा मिळण्यासाठी संदर्भीत रस्त्याचे विकास काम मार्गी लावले.

पावसाळ्यापूर्वी संदर्भीत रस्त्याचे काँक्रीटीकरण, दुतर्फा गटारे काम, तसेच रस्त्याखालील जलवाहिनी शफिटिंग काम या बाबत शनिवारी कार्यकर्ते, नागरिक यासह पाहणी करीत, ठेकेदाराला पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे काँक्रीटीकरण, गटारे काम पुर्ण करण्याच्या सूचित केले. या प्रसंगी केडीएमसी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप तांबे देखील उपस्थितीत राहत त्यांनी या कामाचा आढावा घेत ७जून पूर्वी संदर्भीत रस्त्याचे क्राँक्रटीकरणाचे गटाराचे काम पूर्ण होईल असे यानिमित्ताने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top