अंबरनाथमध्ये दमा तत्सम आजारांवर आयुर्वेदिक उपाय ‘फिश प्रसादम’
अंबरनाथ – अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर १७८ वर्ष आयुर्वेद युनानी अनुभव असणाऱ्या हैदराबाद आयुर्वेद संस्था आणि गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीने नगरसेवक विश्वजीत करंजुले -पाटील व भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा भाजपा गटनेते अभिजीत करंजुले -पाटील यांच्या संकल्पनेतून अंबरनाथ मध्ये ९ जून २०२६ रोजी आयोजित ‘मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प’ शिबिराला केवळ राज्यातूनच नव्हे, तर परराज्यातून देखील अस्थमाच्या विविध आजारांवर आयुर्वेद उपचारासाठी हजारोच्या संख्येने लोकांनी रांगेत उभे राहून या शिबिराचा लाभ घेतला. मागील ८ वर्षात ५४ हजाराहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. तर यंदा ९ व्या वर्षी सुमारे ६२०० रुग्णांनी लाभ घेतल्याचे आयोजक अभिजीत करंजुले-पाटील यांनी सांगितले.
या मोफत अस्थमा ट्रीटमेंट शिबिराचे उद्घाटन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन अंबरनाथ नगरपालिकेच्या भाजपा नगराध्यक्ष तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले, ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील, सुभाष साळुंके, भाजप नगरसेवक मनीष गुंजाळ, नगरसेविका नगरसेविका वैशाली थेटे, महिला मोर्चा अध्यक्षा कांचन मिश्रा, पुनम जाधव रीना मोरे, सुनिता लयाळ, भाजपा शहर संघटन सरचिटणीस दिलीप कणसे,आप्पा कुलकर्णी माजी नगरसेवक भरत फुलोरे, भाजपा उपाध्यक्ष दीपक कोतेकर मिलिंद गान, दुर्गेश चव्हाण, आतिश पाटील, समाजसेवक अजय मोहरीकर, अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी धल,एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड, डॉ. वाणी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, स्वयंसेवक, नगरसेवक यांच्या सहकार्याने अंबरनाथ (पूर्व )छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळ, बी केबिन रोड, जीबीके ग्रुप-स्वानंद कॉम्प्लेक्सच्या आवारात यंदा ९ वर्षांच्या परंपरेने ‘मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प’ राबवण्यात आले. राज्य तसेच इतर राज्यातूनही दमा तत्सम आजारावरील औषध घेण्यासाठी रुग्णांची मोठी गर्दी झाली होती.
विशेष म्हणजे हैदराबाद येथील जवळपास पावणे दोनशे वर्षांपासून अस्थमावर उपचार करणारी जुनी आयुर्वेदिक पद्धत आहे. एका छोट्या ‘मुरेल’ बेबी फिशच्या तोंडावर औषधी लावून जिवंत मच्छी गिळून त्यावर थंड पाणी पाजून उपचार केला जातो. गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीने तेथील आयुर्वेद संस्थेला विनंती केली होती. हैदराबाद येथे सर्वच गोरगरिबांना प्रवास खर्च किंवा इतर अडचणीमुळे उपचार घेता येत नाहीत. अशा रुग्णांना महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ येथे ही उपचार पद्धती सुरू करावी. त्या अनुषंगाने त्या यंदा नऊ वर्षांच्या परंपरेने अंबरनाथ येथे मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. हैद्राबाद येथील आयुर्वेदिक संस्थेचे पथकासह आयुर्वेदाचार्य डॉ. राम जामोदे यांच्या उपस्थितीत सकाळी साडेसात वाजता शिबिराला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत रुग्णाला औषध देण्यात आले. प्रामुख्याने मृगदक्षत्राच्या सुरुवातीच्या ४८ तासाच्या आतच ही हर्बल औषधाची मात्रा मुरेल मासळी आणि शाकाहारीना केळीतून दिली जाते. खूप मोठ्या प्रमाणात राज्यासह इतर राज्यातून नागरिक येत असतात. दरवर्षी हजारो रुग्ण या अस्थमा शिबिराचा लाभ घेत घेत असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक गुलाबराव करंजुले-पाटील यांनी सांगितले.


