बदलापूर – मनसे नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना, लोअर परळ वर्कशॉप शाखेतर्फे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाला कामगारांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. लोअर परळ वर्कशॉपमधील तब्बल १६९ रक्तवीरांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी कृतीतून सिद्ध केली. या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून, मानवतेच्या सेवेसाठी उभारलेले हे एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रक्तदाते, महाराष्ट्र सैनिक, देणगीदार, कर्मचारी, अधिकारी आणि सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला पक्षाचे सरचिटणीस संजय नाईक, सरचिटणीस रीताताई गुप्ता, सरचिटणीस नगरसेविका सुप्रियाताई दळवी, उपाध्यक्ष संजय जामदार, उपाध्यक्ष बंटी म्हशीलकर, शिवडी विभाग अध्यक्ष राजेश मोरे, वरळी विभाग अध्यक्ष उत्तम सांडव, व्यापारी सेनेचे सरचिटणीस आनंद प्रभू तसेच शाखाध्यक्ष आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले.
याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, सरचिटणीस लहू थळे, केंद्रीय खजिनदार दिलीप तळेकर, सचिव स्वप्नील पंडित, चिटणीस सुधीर वरखडे, उपाध्यक्ष भास्कर खुडे, अरुण भालेराव व सुनील तांबे, पश्चिम रेल्वे मुंबई डिव्हिजनचे अध्यक्ष प्रशांत घागरे, खजिनदार रत्नाकर पवार, उपाध्यक्ष श्रीधर मेजर, डीआरएम युनिटचे अध्यक्ष भाऊसाहेब गीते, जेआरएच सचिव मनीष सोलंकी तसेच रघु भोसले यांनीही या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महारक्तदान शिबिराने सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श निर्माण करत मानवसेवेचा संदेश अधिक दृढ केला. १६९ रक्तवीरांच्या या सहभागामुळे लोअर परळ वर्कशॉप शाखेने समाजहिताच्या कार्यात एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.


