ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट मंडईला मोठी आग लागली आणि या आगीत एक जवान व एक सुरक्षारक्षक असे दोन जण शहीद झाले. या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा सवाल भाजपाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. आज ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडत असताना याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका मुख्यालयात भाजपच्या नगरसेवकांनी गावदेवी दुर्घटनेला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. (छायाचित्रकार : मनोज सिंह)


