महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका विभागामार्फत मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (2) डॉ. राहुल गेठे व उपआयुक्त (अनधिकृत बांधकामे नियंत्रण विभाग) डॉ. अमोल पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली कार्यालया अंतर्गत A-270, से-02, ऐरोली, नवी मुंबई येथे श्री. आनंद पूजारी यांनी (ठेकेदार) यांनी बांधकाम परवानगी व्यतिरिक्त अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते.
श्री. आनंद पूजारी यांनी (ठेकेदार), A-270, से-02, ऐरोली गाव, ऐरोली, नवी मुंबई यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांस जी विभाग कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये दि. 12.06.2026 रोजी नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले होते.
सदरचे अनधिकृत बांधकाम श्रीम. साधना पाटील, सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी ऐरोली, यांचे नियंत्रणाखाली तोडक मोहिमेचे आयोजन करुन सदर अनधिकृत बांधकाम अंशतः निष्कासित करण्यात आले.
या धडक मोहिमेसाठी जी-विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे अधिकारी / कर्मचारी, मजूर 16, ब्रेकर-2, तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.


