टीईटी पेपर कृती प्रकरणी चौथा आरोपी अटक

फरार मुख्य आरोपीच्या पत्नीला पटना येथून घेतले ताब्यात

डी एड शिक्षकांच्या पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर फुटी प्रकरणी चौथा आरोपी अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. मुख्य फरार आरोपी विजेंदर गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी गुप्ता हिला पटना येथून ताब्यात घेतले आहे. मंगळवारी भिवंडी न्यायालयात न्यायाधीश एस एम सुतार यांच्या न्यायालयातील तिला हजर केला असता या पूर्वीच्या अट तील तिघा आरोपी एवढीच सहा जुलै पर्यंत सुमनकुमारी गुप्ता हिला पोलीस कोठडीत उठवण्यात आली आहे.

मुख्य फरार आरोपी विजेंदर गुप्ता हा या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार असून त्याचा यापूर्वी ओडिशा टी ई टी पेपर फुटी प्रकरणात सहभाग होता. त्याचा पत्नी सोबत असलेला मोबाईल संपर्क व त्यामधून सुमनकुमारी हिला काही आर्थिक लाभ मिळाला आहे का हे तपासण्यासाठी सरकारी अभिवक्ता अँड सुमित जाधव यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. तर आरोपीचे वकील अँड. शैलेश गायकवाड यांनी पाहिजे असलेला मुख्य आरोपीची पत्नी असल्याने त्यांच्यात संपर्क होता. याचा अर्थ ती आरोपी होत नाही. असे असते तर त्या आपल्या घरी राहिल्या नसत्या. त्यांनी पोलिसांना सहकार्य केल्याची बाजू मांडली. यावर न्यायालयाने तपास कामी सुमनकुमारी गुप्ता हिला ६ जुलै पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Scroll to Top