औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भव्य अप्रेंटिसशिप व रोजगार मेळावा संपन्न

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुलुंड आणि नाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अप्रेंटिसशिप व रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ३५० हून अधिक उमेदवारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध औद्योगिक व सेवा क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाग चिऊन युवक-युवतींसाठी अप्रेंटिसशिप व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या उपक्रमातून १४० हून अधिक युवक-युवतींना रोजगार व अप्रेंटिसशिपच्या संधी नाप्त झाल्या.

मेळाव्यात गोदरेज एंटरप्राइज ग्रुप, भारत बिजली लिमिटेड, सिएट टायर, इंडिमो टेक जेसीबी, नक्षत्र स्किल डेव्हलपमेंट कॅम्पस प्रा. लि., आयपीएस ग्रुप्स, मॅनपावर सप्लाय कन्सलटन्सी, टॅलेंटसेतू सर्विसेस प्रा. लि., सिनटेक
इलेक्ट्रोमेक प्रायव्हेट लिमिटेड, सुजलर पंप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नेक्सजेन प्रायव्हेट लिमिटेड, जेटस्प्रे इनोव्हेशन्स, प्रगती इलेक्ट्रिकल्स प्रा. लि, गार्गी हार्डनेस अल्बर्टस प्रा. लि. तसेच रँडस्टैंड इंडिया
यांसह विविध नामांकित उद्योग व कंपन्यांनी सहभाग नोंदवून पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि अप्रेंटिसशिप तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशनचे आर्थिक भागीदार eClerx यांचेही मोलाचे योगदान लाभले. मेळाव्याचे उदघाटन औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे गटनिर्देशक जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्राध्यापक पागधरे आणि देशी, तसेच लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशनच्या केंद्र प्रमुख पल्लवी कदम, संस्था प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

युवकांना कौशल्य प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप आणि रोजगाराच्या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यास विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच सहभागी कंपन्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशा उपक्रमांमुळे उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होत असून युवकांच्या रोजगारक्षमतेला मोठी चालना मिळत आहे.

Scroll to Top