श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा – २०२६ अंतर्गत दिंडी क्रमांक १२२ चे प्रमुख ह.भ.प. रत्नेश्वर महाराज तसेच अशोक तांदळे व किरण लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसमधील कल्याण-पुणे प्रवासी ग्रुपचे सदस्य, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी, तसेच इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी व मित्रपरिवार यांनी एक दिवस पालखी सोहळ्यात सहभागी होत पायी वारीचा आनंद घेतला. श्री विठ्ठलाच्या चरणी भक्तिभावाने सेवा अर्पण केली. या भक्तिमय सोहळ्यात श्रद्धा, समर्पण आणि एकात्मतेचे दर्शन घडल्याचे दि. म्युनिसिपल को-ऑप. बँक लि., मुंबईचे संचालक तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अनुज्ञापन निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले.


