नीट परीक्षेतील पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान न्यांचा राजीनामा काँक्रोच जनता पार्टनि (सीजेपी) मागितला असून प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते. परंतु दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उपोषणस्थळावरुन बळजबरीने ताब्यात घेतल्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे. रविवारी ठाण्यातही वांगचुक न्यांच्या समर्थनार्थ आणि प्रधान न्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) निदर्शन करण्यात आली.
यावेळी शेकडो तरुणांनी यात सहभाग नोंदविला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरुन दिल्ली पोलिसांनी बळजबरीने हटविल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचुक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. याच ठिकाणी ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दीपक्के यांच्यावरही शाईफेक झाली. याचा निषेध करण्यासाठी शस्द पवार गटाच्या नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सोनम वांगचुक यांनी मागील २० दिवसांपासून नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीच्या विरोधात शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने उपोषण करत आहेत.


