येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने शहरात भव्य पालखीसह दिंडी व आरती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,
महाराष्ट्रातील संतांच्या भूमीचे दर्शन व्हावे व आपले संत व संस्कृती मुलांना कळावी या साठी नेहमीच शाळा प्रयत्न करत असते. या आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी शहरात पालखी काढून विठ्ठल रखुमाईंचे दर्शन दिले तसेच अभंग, हरिपाठ व लेझीम नृत्य करुन शहरातील विविध भागात दिंडी काढण्यात आली. शाळेचे संस्थापक अध्यक्ष तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत भक्तीमय वातावरणात निर्माण झाले होते. ग्रामपंचायत कार्यालय जवळ आरती घेण्यात आली. या कार्यक्रमावेळी पोलिस निरीक्षक सुनील बच्छाव, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाटील, भास्कर चंदे, संदीप पाटील, योगेश जोशी, संदीप म्हसकर आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते. तर यामध्ये शाळेचे शिक्षक – शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेत परिश्रम घेतले होते.


