घोडबंदर मार्गावर भीषण अपघात; २५ टन वजनाचा कंटेनर १० फूट खोल खड्यात

घोडबंदर मार्गावरून हजारो अवजड वाहने जेएनपीए बंदरातून गुजरातच्या दिशेने वाहतूक करतात. हा मार्ग वाहतुकासाठी अत्यंत महत्त्वाचा असून यात मार्गालगत लोकवस्ती देखील वाढली आहे. मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत मानपाडा येथे पाण्याच्या टाकीसाठी सुमारे १० फूट खोल खड्डा खणला होता.

रविवारी सकाळी जेएनपीए बंदरातून गुजरातच्या दिशेने कंटेनर वाहतूक करत होता. हा कंटेनर सकाळी ६ वाजताच्या सुमारास मानपाडा भागात आला असता, चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर खोल खड्यात कोसळला. या कंटेनरमध्ये २५ टन वजनाचे भंगारातील वाहनाची चाके होती.

घटनेची माहिती
मिळाल्यानंतर रुग्णवाहिकेतील डॉक्टर, चितळसर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे कंटेनर चालक अमित यादव हा कंटेनरमध्ये अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला कंटेनरमधून बाहेर काढले.

Scroll to Top