मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने तसेच ‘देवाभाऊ चष्मा’ उपक्रमाचे निर्माते समाजसेवक शाकिब गोरे यांच्या सहकार्याने ठाणे शहरात सलग तीन दिवस भव्य नेत्रतपासणी व मोफत चष्मा वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात नागरिकांसाठी अत्याधुनिक नेत्रतपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नगरसेवक विकास पाटील, उषा वाघ, अमित सर, सुरेश कांबळे, नम्रता कोळी, अनिता यादव आणि कमत चौधरी यांच्या प्रभागांमध्ये हे शिबिर मोठ्या उत्साहात पार उत्स्फूत प्रतिसाद पडले.
या उपक्रमाद्वारे ५,००० हून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, पात्र लाभार्थ्यांना मोफत ‘देवाभाऊ चष्मा’ वितरित करण्यात आला.
शिबिरास आमदार अॅड. निरंजन डावखरे, संदीप लेले तसेच अन्य मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.


