कल्याण जिल्हा कारागृह अधीक्षक एच.एस. मिंड यांच्या प्रयत्नातुन रविवारी सामाजिक वनिकरण विभाग, बदलापूर यांच्याकडुन 900 बांबु, 500 करंज, 100 चिंच, 100 काजु, 500 आपटा, 100 आवळा, 500 कांचन अशी एकुण 2700 रोपे मोफत देण्यात आली आहेत. त्यापैकी कारागृहाच्या ताब्यातील जमिनीच्या बांधावर 700 बांबु, 100 करंज, 30 चिंच, 50 आवळा रोपांची लागवड करण्यात आली असुन, उर्वरीत रोपांची लागवड करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे. या वृक्षारोपणावेळी कल्याण जिल्हा कारागृह अधीक्षक एच.एस. मिंड, उपअधीक्षक यु. पी. पाटील, वरीष्ठ तुरुंगाधिकारी ए.एस. कोळी, तुरुंगाधिकारी जी. वडते, पी.यु. खरात, एस. एम. बाविस्कर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहुन वृक्षारोपण केले. आर.


