२६ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे प्रवासाचे मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. या कामासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला असून तो तातडीने रेल्वे बोर्डाने वितरीत करावा, अशी प्रमुख मागणी आज खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली. तसेच रत्नागिरी-दादर पैसेंजर पूर्ववत करावी, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार सीएसएमटी/ एलटीटी पर्यंत करावा, कोकण रेल्वेवर नवीन ट्रेन सुरु करावी, मुंबई मडगांव वंदे भारत एक्सप्रेसची सेवा पूर्ववत करुन आठवड्यात ६ दिवस सुरु ठेवावी, गणेशोत्सवासाठी जास्तीतजास्त गाड्या सोडाव्यात अशा मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देऊन केल्या,
खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन रेल्वेच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. काही काळ हे काम संथ गतीने सुरु होते. या कामासाठी २५० कोटींचा निधी रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे
मात्र हा निधी रेल्वे बोर्डाकडे वर्ग करण्यात आला नसल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून देत तात्काळ निधी वर्ग करण्याची विनंती केली. अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दाखवत निधी तात्काळ वर्ग करण्याची मागणी मान्य केली.
पूर्वी धावणारी गाडी क्रमांक ५०१०३/५०१०४ रत्नागिरी-दादर पैसेंजर ही गाडी कोकण विभागातील कष्टकरी, रोजचे प्रवासी, छोटे व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना थेट मुंबईशी जोडणारी एक २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबई, संपूर्ण कोकण प्रदेश आणि गोवा यांना जोडणारी एक अत्यंत लोकप्रिय प्रीमियम रेल्वे सेवा आहे. जून २०२३ मध्ये सुरू झाल्यापासून, या ट्रेनला पर्यटक, व्यावसायिक प्रवासी, विद्यार्थी आणि कोकण रहिवाशांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. तथापि, वर्षभर सातत्याने १०० टक्क्यापेक्षा जास्त बुकिंग होऊनही, ही ट्रेन सध्या केवळ ८ डब्यांसह धावत आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे या ट्रेनची सध्याची वारंवारता कमी करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. कोकण रेल्वेचा रोहा-मडगाव विभाग आधीच अंदाजे 168 टक्के क्षमतेने कार्यरत आहे. या अत्यंत व्यस्त आणि गर्दीच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेससारख्या महत्त्वाच्या ट्रेनच्या फेऱ्या कमी केल्यामुळे प्रवाशांची जागांसाठी मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. पावसाळ्यात कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त असते. ही गरज लक्षात घेता, प्रवासी वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची आठवड्यातून सहा दिवस चालणारी सेवा संपूर्ण पावसाळ्यात सुरू ठेवावी.


