कंत्राटी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडविणार – महापौर शर्मिला पिंपळोलकर

ठाणे – कायम कामगारांप्रमाणे वेतन, भत्ते आणि सुविधा लागू कराव्यात, कंत्राटी कामगारांना वैद्यकीय उपचार सुविधा व मेडिक्लेम पॉलिसी लागू करण्यात यावी. वयोमानानुसार कमी केलेल्या किंवा मयत झालेल्या कंत्राटी कामगारांना ग्रॅच्युइटीची (Gratuity) रक्कम अदा करावी, लाड-पागे कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यात या ठाणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर येत्या शुक्रवार पर्यंत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शुक्रवारी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या श्रमिक जनता संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

प्रलंबित प्रश्नां संदर्भातील संबंधित अधिकाऱ्यांसह मा. आयुक्त यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याचे आदेश उपआयुक्त (मुख्य) जी.जी. गोदेपुरे यांना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना दिले असुन सदर बैठकीत श्रमिक जनता संघ युनियनच्या शिष्टमंडळाला देखील चर्चेतसहभागी करून घेतले जाईल असे महापौरांनी स्पष्ट केले.
आंदोलनां नंतर झालेल्या चर्चेत महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, उपआयुक्त गजानन गोदेपुरे, कामगारांच्या वतीने सरचिटणीस जगदीश खैरालिया, सचिव सुनील दिवेकर, विनायक आंम्ब्रे, अर्चना पवार, गणेश चव्हाण, संतोष देशमुख, विमल खाडे, भास्कर शिगवण आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात श्रमिक जनता संघ युनियनचे उपाध्यक्ष डॉ. संजय गोपाळ यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.

Scroll to Top