दिव्यात मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांची ‘शांती’ करत उपहासात्मक आंदोलन

दिवा शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिवा शहर शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिवा (पूर्व) येथे ‘खड्यांची शांती’ हा उपहासात्मक आंदोलन केले. तर या शांती दरम्यान दिव्यातील रस्त्याचा घोटाळा ही मनसेने बाहेर काढला.

दिवा शहरातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनचालक, पादचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना रोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे ठाणे महापालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. महापालिका प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी आणि तातडीने खड्डे दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत, या मागणीसाठी हे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर तरी महापालिका अधिकाऱ्यांना सुबुद्धी येऊन शहरातील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा मनसेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.


या आंदोलनात दिवा मनसेचे जिल्हा संघटक 927102
तुषार पाटील, विधानसभा सचिव शरद पाटील, शहर अध्यक्ष प्रशांत गावडे, महिला शहर अध्यक्षा अंकिता कदम, शहर सचिव परेश पाटील, उपशहर अध्यक्ष देवेंद्र भगत, किरण दळवी, प्रकाश पाटील, नम्रता खराडे, विभाग अध्यक्ष देवदत्त घाडी, शैलेंद्र कदम, जयेश घरत यांच्यासह इतर पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Scroll to Top