आधार सहकारी पतपेढी मर्यादित ठाणे या पतपेढीची ३२ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि ९/८/२०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नुरी हॉल, नुरीबाबा दर्गा रोड, मखमली तलावाच्या बाजूला, चंदनवाडी, ठाणे (प.) येथे सभासदांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
या वेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजयराव देशमुख यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. संस्थेची अद्यावत स्थिती पुढीलप्रमाणे संस्थेचे मुख्य कार्यालय व पाच शाखा आहेत ८८२९ सभासद असून संस्थेचे खेळते भांडवल १३०.२५कोटी, संमिश्र व्यवसाय १८७ कोटी व निव्वळ नफा १.४५ कोटी झाला असून संस्थेने ‘अ’ वर्ग कायम राखत १२% लाभांश मंजूर केला आहे. संस्थेच्या सर्व सभासदांसाठी रविवार दिनांक २३/८/२०२६ रोजी सभासद प्रशिक्षण व मेळावा शुभश्री लॉन्स मंगल कार्यालय, नगर कल्याण हायवे, अहिनवेवाडी फाटा समोर, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष भरतशेठ दांगट साहेब यांनी दिली.


