जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने येथील माहुली विभागात आठ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिजाऊ संस्थेच्या वतीने संपूर्ण कोकणातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या ३५ लाख मोफत वह्या वाटप अभियानांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.
यामध्ये सावरोली, मामनोली, चांदरोटी, माहुली, काटेकुई, आंबेवाडी, जांभुळपाडा आणि बोरीचापाडा येथील शाळां मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी जिजाऊ संघटना शहापूर अध्यक्ष तथा रत्नागिरी संपर्क प्रमुख दिनेश निमसे, जिजाऊ संस्थेचे तालुका प्रमुख सुदर्शन पाटील, जिजाऊ संघटनेचे समन्वयक भगवान वेखंडे, माहुलीचे सरपंच चिंतामण निखडे, श्रीकांत वेखंडे, दत्ता मोरे, संदीप ठाकरे, कमलाकर भोईर, आनंद ठाकरे, किशोर धसाडे, विनोद निमसे, यशवंत वाख, आशिष कटारे, सोपान कापटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शहापूर तालुक्यातील विविध शाळांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्या बरोबरच त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी संस्थेचे विविध उपक्रम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


