भाजपा उत्तर भारतीय आघाडीचा दायित्व उत्सव आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न

भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडी, कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली पूर्व येथील शगुन हॉलमध्ये दायित्व उत्सव आणि भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर परब यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजप उत्तर भारतीय आघाडी, कल्याण जिल्हाध्यक्ष नागेंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा भव्य कार्यक्रम पार पडला.

या सोहळ्यात नागेंद्र शर्मा यांच्या नेतृत्वाखाली विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक क्षेत्राशी संबंधित मोठ्या संख्येने नागरिकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रहित, विकास आणि जनकल्याणाच्या धोरणांनी प्रभावित होऊन पक्षात सहभागी झालेल्या नव्या कार्यकर्त्यांचे शर्मा यांनी स्वागत केले. तसेच पक्षाची विचारधारा आणि कार्यपद्धतीनुसार सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब,उल्हासनगर संपर्कप्रमुख नाना सूर्यवंशी, संघटन महासचिव रवी सिंह ठाकूर, जिल्हा कोषाध्यक्ष दिनेश दुबे, शशिधर शुक्ला यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top