नारळी पौर्णिमेनिमित्त नवी मुंबईत आनंदाला उधाण

सरसोळे, दिवाळे कोळीवाड्यात उत्साह

मूलतः कोळी आणि आगरी समाज बांधवांची वस्ती असलेल्या नवी मुंबईमध्ये आज नारळी पौर्णिमेनिमित्त शहराच्या विविध भागात आनंदाला उधाण आले होते. दर्या राजाची विधिवत पूजा करून त्याची कृपादृष्टी सर्वांवर राहावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. वाजतगाजत, नाचत पालखी मिरवणुका निघाल्या.

सारसोळे आणि दिवाळे कोळीवाडा येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दोन्ही ठिकाणी माजी आमदार संदीप नाईक यांनी उत्सवात सहभागी होत कोळी बांधवांच्या आनंदात सहभाग घेतला.

दिवाळे कोळीवाड्यात ग्रामस्थांच्या वतीने आयोजित ‘नारळ सोन्याचा, दिवाळे गावचा’ या विशेष उत्सवात पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. समुद्राला सखा मानणाऱ्या कोळी समाजाच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा, सांस्कृतिक वारसा आणिसागरी जीवनशैलीचे दर्शन यावेळी घडले. समुद्र देवतेची पूजा करून समुद्र व पर्यावरणाच्या संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.

सरसोळे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त भव्य पारंपरिक पालखी मिरवणूक काढण्यात आली.

Scroll to Top