राष्ट्रवादी काँग्रेसची ‘क्लस्टर’ कार्यालयावर धडक

नुकत्याच झालेल्या ठामपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्यासाठी क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनी म्हणजे ‘तैनाती फौज’ असल्याचा आरोप करीत कंपनीच्या हातातील क्लस्टरचा कारभार काढून घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रथात यांच्या नेतृत्वाखाली तीन हात नाका ते क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो ठाणेकर सहभागी झाले होते.

क्लस्टरच्या अंमलबजावणीचे कंत्राट क्लस्टर विकास कंपनीस देण्याच्या ठरावास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षासह सत्तेत सहभागी असलेल्या भाजपनेही विरोध केला आहे, मात्र बहुमताच्या जोरावर हा ठराव पारित करण्यात आला आहे. या ठरावामुळे ठाणे शहरातील विकासात्मक धोरणे ठरविण्याचा अधिकार ठामपाऐवजी कंपनीला मिळणार असल्याचा आरोप करीत हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चेकऱ्यांनी हातात क्लस्टर कंपनीचा निषेध करणारे फलक घेतले होते. तीन हात नाका येथून सुरू झालेला हा मोर्चाचा क्लस्टर कार्यालयावर समारोप करण्यात आला.

मोर्चात कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष तथा गटनेते अभिजीत पवार, महिलाध्यक्ष मनिषाताई भगत, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, मुंब्रा प्रभाग समिती सभापती दिपाली भगत, नगरसेवक यासीन कुरेशी, प्रकाश बर्डे, सुधीर भगत, महिला कार्याध्यक्षा फुलबानो पटेल, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, श्रीकांत भाईर, सरचिटणीस राजेश साटम, विरू वाघमारे, मिलींद बनकर, मकसूद खान, सुरेंद्र उपाध्याय, शमीम खान, बुद्धभूषण गोटे, जगत सिंह, सचिन पंधेरे, कुलविंदर सिंह, मेहरबान पटेल, एकनाथ जाधव, कृणाल भोईर, पद्माकर पाटील, बिपीन गेहलोत, समाधान माने, उमेश अग्रवाल, पुजा शिंदे, माधुरी सोनार, आसिम शेख, प्रदीप साटम, राजू चापले, वैभव विचारे, विशांत गायकवाड, शुभम द्विवेदी, संदीप ढकोलिया, राकेश भगत, रत्नेश दुबे, ज्ञानेश्वर राजपंखे, मुलीम खान, निलेश सावंत, गजानन चौधरी, दिलीप नाईक, राजु शिंदे, राहू पाटील, संतोष साटम, मनिषा पाटील, दिपाली गावंड, दिलीप उपाडे, पप्पू अस्थाना, शेखर भालेराव, किशारे फुपाणे, संदिप येताळ, विश्वास चव्हाण सहभागी झाले होते.

Scroll to Top