धानवळ आश्रमशाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा मान्यवरांचा संदेश

तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, धानवळ येथे दहावी बोर्ड परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती आणि पत्रकार संघ, मोखाडा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे, तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जिद्द निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमंत वाघरडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मोखाडा तालुक्याचे माजी सभापती प्रदीप वाघ उपस्थित होते.

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा धानवळ येथील दहावीच्या बोर्ड परीक्षेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संजीवनी टोपले हिने ७४.६० टक्के, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या प्रतिमा वाघ हिने ७४ टक्के, तर तृतीय क्रमांक

Scroll to Top