अमरावती येथे थांग-ता ऑल महाराष्ट्र थांग ता असोसिएशन माध्यमातून २४ ते २६ ऑगस्ट दरम्यान ३० वी राज्यस्तरीय थांग-ता स्पर्धा अमरावती येथे आयोजित करण्यात आली. थांग-ता हा मणिपूर मधील पारंपारिक मर्दानी खेळ आहे. अमरावती येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यातील सर्व जिल्हा मधून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ठाणे जिल्ह्यातून कल्याण, डोंबिवली, ठाणे शहर, भिवंडी, टिटवाळा, खडवली येथील ४२ खेळाडूंनी सहभागी झाले.
यामध्ये विविध वजनी गटात खेळाडूंनी अनेक पदके पटकावली आहेत. यामध्ये अमन ढोकळे, विराज निक्कम, समर्थ गोळे, अथर्व मुखेकर, वेदांत नवलागी, इशान भोईर, गंजू पटेल, अर्णव जाधव, निलेश नायकोडी, मिताली घाडशी, वैष्णवी शाह, आर्या यादव, पलक चौटाला, जयकुमार चव्हाण,देवराज ऐहोळी, हर्ष तारे, दीक्षा यादव, काव्या पिल्लई, अन्सारी अतीकुरेंहमम, भार्गवी कुडव यांनी सुवर्ण पदक पटकावले.
तर सौमित कोळंबकर, रुद्रांश चव्हाण, कनिष्का गुंजाळ, तेज भोसले, घरशीत शहा, दीया पवार,अक्षय राठोड, सूरिश मोंडल, अवनी सावंत, आश्रिया सिंह, अन्सारी अतीकुर रहमम यांनी रौप्य पदक पटकावले. खातू, निकन नाईक, अथर्व मोहिते, गौरी भोसले, तेज राठोड, श्रेया शिंपी, कार्तिक चव्हाण, विभावरी गायकवाड,लक्ष सोमाणी यांनी कास्य पदक पटकावले. हितांशी पटेल, स्वानिक शिंदे यांनी सहभाग घेतला.
या खेळाडूंना ऑल ठाणे डिस्ट्रिक्ट थांग-ता स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, उपाध्यक्ष अंकुर आहेर, सचिव गिरीश वाघमारे, खजिनदार संजय पवार, प्रशिक्षक डॉ. जॉय, मोमीन, सुचरिता या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल ऑल ठाणे डिस्ट्रिक्ट थांग-ता स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी प्रशिक्षक, सचिव व खेळाडूंचे कौतुक केले.


