श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र, पारनाका, कल्याण येथील परिसरात भाजप नेते व कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारनाका परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शेकडो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत ईश्वर औदुंबर वृक्ष देखील या ठिकाणी लावण्यात आले. स्वामी समर्थ सेवेकरी परिवारासोबतच कल्याण मधील प्रसिद्ध उद्योजक राजू गवळी व प्रकाश भराडिया हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. सर्वांनी नरेंद्र पवार यांना याप्रसंगी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


