नशा मुक्ती कार्यक्रमादरम्यान ऋग्वेद शेट्टी यांचा पोलिस आयुक्तांकडून विशेष सन्मान

rigved shetty police commissioner

भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यक्षेत्रात नशा मुक्ती कार्यक्रम समाजामध्ये राबविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी शहरातील समाज माध्यमांवर रिल च्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्यांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा यशस्वी करण्या साठी पोलीस प्रशासनाच्या सोबतच ऋग्वेद शेट्टी यांनी विशेष मेहनत घेतली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शुभहस्ते भिवंडी शहरात पार पडला. या कार्यक्रमात ऋग्वेद शेट्टी यांचा पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शुभहस्ते आमदार महेश चौघुले, रईस शेख, महापौर नारायण चौधरी, पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान केला.
नशामुक्तीसाठी फक्त पोलिसांनी कारवाई करून चालणार नसून त्यामध्ये समाजाचे विशेषतः तरुणाईने सहभाग घेतला तर नक्कीच भिवंडी नशामुक्त होऊ शकतो असा विश्वास व्यक्त करीत हा माझा नसून संपूर्ण युवाशक्तीचा सन्मान आहे अशी प्रतिक्रिया ऋग्वेद शेट्टी यांनी दिली आहे.

Scroll to Top