बाप्पाच्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरातील विविध विसर्जन घाटांवर भाविकांची मोठी गर्दी होत असताना वाहतूक सुरळीत राहावी, विसर्जन मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने पार पडाव्यात आणि नागरिकांना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना ठाणे, दिवा शहर यांच्या पदाधिकारी व सदस्यांनी पोलिसांना सहकार्य करत सामाजिक सेवा बजावली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे, संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे आणि महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा धनश्री उत्पात यांच्या मार्गदर्शनाखाली, कोकण विभाग संघटिका शर्मिला म्हात्रे तसेच ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अजय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
विशेष म्हणजे संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी कोणताही मोबदला न घेता गणपती विसर्जनाच्या काळात पोलिसांना बंदोबस्तासाठी सहकार्य केले.
दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस तसेच अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनावेळी दिवा शहरातील विसर्जन घाटांवर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या काळात गर्दीचे नियोजन, वाहतूक सुरळीत ठेवणे, विसर्जन मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सहकार्य करणे तसेच नागरिकांना आवश्यक माहिती व मदत उपलब्ध करून देण्याचे काम संघटनेच्या सदस्यांनी केले.
या सामाजिक उपक्रमात संघटनेच्या उपाध्यक्षा ज्योती घाडीगांवकर, कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी, संपर्कप्रमुख सरोजनी खत्री, सचिव भारती कांबळी, संघटिका भारती फडणीस, प्रसिद्धीप्रमुख मनाली, सहसंघटिका वांशिका डाफले, RTI संपर्कप्रमुख नंदा चव्हाण, सल्लागार संजय शिंदे, प्रभारी लक्ष्मी विंशे, सरचिटणीस प्रिया देसाई यांच्यासह ज्योती मापारी, राजश्री भिलारे, प्रगती हरणेकर, संजय ठाकूर, चित्रा भुवंड, शैलेश पाटोळे, जयदीप विंशे, विनिता सागवेकर, माया भिल्लारे आणि कविता भोसले यांनी सहभाग घेतला.
गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी तसेच भाविकांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण मिळावे यासाठी संघटनेने केलेल्या सहकार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
गणपती विसर्जनात सामाजिक संस्थांचे पोलिसांना सहकार्य



