ज्येष्ठ पत्रकार एकनाथजी बिरवटकर यांना ‘ठाणे भूषण’ पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार एकनाथजी बिरवटकर यांना 'ठाणे भूषण' पुरस्कार

महाराष्ट्र संपादक परिषदेचे मुंबई सचिव तथा ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बिरवटकर यांना ठाणे महापालिकेच्या वतीने प्रतिष्ठेच्या ‘ठाणे भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिरवटकर यांना पुरस्काराचे मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ठाणे महानगरपालिकेने बिरवटकर यांची ‘ठाणे भूषण’ पुरस्कारासाठी निवड केली होती. ठाणे शहरातील विविध नागरी, सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांचे सातत्याने वृत्तांकन करताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून दिले. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.
गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या बिरवटकर यांनी ठाणे शहर आणि परिसरातील विविध प्रश्नांचे सातत्याने वृत्तांकन केले आहे. पाणीपुरवठा, वाहतूक, नागरी सुविधा, पुनर्विकास, सामाजिक प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना त्यांनी आपल्या वृत्तांकनातून सातत्याने स्थान दिले. या कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपलोळकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सभागृह नेते हणमंत जगदाळे, नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक रमाकांत मढवी, मनोज शिंदे, देवराम भोईर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार एकनाथजी बिरवटकर यांच्या दीर्घ पत्रकारितेतील कार्याची दखल घेत मिळालेला हा सन्मान त्यांच्या योगदानाचा गौरव करणारा ठरला.

Scroll to Top