अमोघ सिद्धी विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित हाशा रामा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिळगाव येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्ण आणि पाच कांस्य पदके पटकावली. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शिळगाव परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रुद्र धोत्रे (इयत्ता १० वी ‘क’) – २ कांस्य पदकेया विद्यार्थ्यांना मेन कोच मनोज बेर्डे आणि उपकोच रजनी गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच शिळगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच प्रशिक्षक मनोज बेर्डे व रजनी गुप्ता यांचेही कौतुक करून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पदक विजेते विद्यार्थी
ईश्वरी राजपंके (इयत्ता ९ वी ‘अ’) – १ सुवर्ण व १ कांस्य पदक
तनवी गाबरे (इयत्ता ९ वी ‘अ’) – १ सुवर्ण व १ कांस्य पदक
सफिना शेख (इयत्ता १० वी ‘ब’) – १ सुवर्ण व १ कांस्य पदक



