टोकावडे-माळशेज रस्त्यावर भीषण अपघात, चार जण जागीच ठार

untitled design

मुरबाड : तालुक्यातील टोकावडे- माळशेज घाट या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास बस आणि स्कार्पिओची जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तर दोन लहान मुलांना कोणतीच दुखापत झाली नसल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणहून नगर अहिल्याबाई जाणारी बस (क्र.एम.एच २० बी.एल ३०४८) सकाळी सुमारे साडे अकराच्या दरम्यान प्रवास करत होती. त्याच वेळी माळशेज घाटाकडुन मुरबाडच्या दिशेने (एम. एच.१५ ई.बी.७२२५) स्कार्पिओ वाहन समोरून येत होती. वैशाखरे गावा पासुन काही मिटरच्या अंतरावर तीव्र वळणाच्या ठिकाणी दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने सदरच अपघात झाला असुन या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघात इतका भीषण होता की स्कार्पिओमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसमधील प्रवाशांना कोणतीच दुखापत झाली असून बसचा इंजिनचा खालचा भाग तुटला असल्याने सदर बस रस्त्याच्या बाहेर फेकली गेली. माहिती मिळताच टोकावडे पोलिस ठाण्याचे स.पो.नि.शितलकुमार नाईक हे घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालय टोकावडे येथे दाखल केले. मात्र या अपघातात (१) अभिषेक मोटे (वय ४५), (२) अविनाश रामचंद्र काकडे, (३) निता अशोक डुरे (वय ४८), (४) मिना कल्याण मडके (वय ४७) हे चार जण मात्र जागीच मृत्यु झाले. हे सर्व नेवासा येथिल असल्याचे बोलले जात असुन या अपघाता मोनिक ही गंभीर जखमी झाली आहे. आराध्य वय वर्ष (१२), वेदांश (वय वर्ष ३) ही दोन लहान बालके मात्र किरकोळ जखमी झाली आहेत.

काही दिवसांपुर्वीच रायते पुलावर भिषण अपघात होऊन अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे टोकावडे-माळशेज या राष्ट्रीय मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याची चिंता व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता चकाचक करण्यात आला असला, तरी धोकादायक वळणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top