ठाणे वार्ता
एस.एस.टी.महाविद्यालयाच्या ९ खेळाडूंची दमदार कामगिरी
कल्याणः
एस.एस.टी. महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत मुंबई विद्यापीठाच्या पुरुष आणि महिला एबी संघांना अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत कांस्य पदक मिळवून दिले असून, या यशामुळे दोन्ही संघांनी प्रतिष्ठित खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस विद्यापीठात ही स्पर्धा पार पडली. भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत देशभरातील ६१ महिला आणि ६२ पुरुष संघांनी सहभाग घेतला होता. मुंबई विद्यापीठाच्या पुरुष संघात एस.एस.टी. महाविद्यालयाचे निशांत चौहान, सुमित चौहान, अनिकेत केवने, शिवप्रसाद शर्मा, गणेश उपाध्याय आणि निखिल चौहान यांनी सहभाग नोंदवला.


