एसटीच्या ठाणे विभागाची अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात धडक मोहीम

ठाणे – राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी वाहतुकीचा परिणाम होत असल्याने परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कडक भुमिका घेतली आहे. 
 ५ जुन पासुन बस स्थानकापासून २०० मीटर परिसरात नो पार्किंग झोनची ठाणे विभागाच्या सुरक्षा व दक्षता विभागाद्वारे कडक अमलबजावणी करण्यात येत आहे.

ही विशेष मोहिम १५ जुन पर्यंत राबविली जाणार असल्याचे ठाणे विभागाचे  सुरक्षा व दक्षता अधिकारी जितेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर प्रियांका नारनवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील सर्व विभागांना अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात  कडक मोहिम राबविण्याला  सुरुवात केली आहे.

या मोहिमे अंतर्गत बस स्थानकांच्या २००  मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनावर प्रणिता गोडे रा.प. निरीक्षक,  राजू तडवी  सहा. सुरक्षा निरीक्षक,  बी, बी. पाटील सहा .सुरक्षा निरीक्षक ही एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाची टीम ,पूनम मोरे ,मयुरी पाटील (RTO) स्थानिक पोलीस यांच्या मदतीने कारवाई करत आहेत.

ठाणे विभागात शहापुर, मुरबाड, कल्याण, वाडा, भिवंडी या परिसरात विभाग नियंत्रक सागर पळसुले देसाई यांच्या नेतृत्वाखाली विभागीय वाहतूक अधिकारी  धनंजय शिंदे, सर्व आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख तसेच स्थानिक पोलीस यांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.




Scroll to Top