अवघ्या ३३ रुपयात मिळणारा ‘देवाभाऊ’चष्मा हा बदलापूरच्या ‘व्हिजन फ्रेंड’ या संस्थेचे संस्थापक साकीब गोरे यांनी तयार केलेला जगातील सर्वात स्वस्त चष्मा म्हणून जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. या संस्थेच्या सौजन्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या भाजप नगरसेविका सुजाता दिलीप भोईर यांच्यावतीने –
बारकुपाडा येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात ‘देवाभाऊ’ चषयाचे मोफत वाटप करण्यात आले. ज्यांना चषयाची गरज आहे, त्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना पुढील महिन्यात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे आश्वासन देण्यात आले. मंगळवारी सकाळी बारकूपाडा येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन अंबरनाथ अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजीत करंजुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा गटनेते आणि नगरसेवक अभिजीत गुलाबराव करंजुले, नगरसेवक सचिन गुंजाळ, नगरसेवक महेश फुलोरे, माजी नगरसेवक भरत फुलोरे, दीपक कोतेकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला भाजपचे नगरसेवक विश्वजीत करंजुले आणि नगरसेविका मीना सुरेश वाळेकर पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिबिराचे आयोजक नगरसेवक सुजाता भोईर यांनी सांगितले की, या शिबिराचा अंदाजे ३५० गरजू लोकांना फायदा झाला आणि २५० हून अधिक जणांना मोफत चष्मे देण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित पाहुण्यांचे स्वागत समाजसेवक दिलीप भोईर यांनी केले.


