कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न झाला. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर अॅड. हर्षाली चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापालिका मुख्यालयातही महापौर अॅड. हर्षाली चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, सहा. आयुक्त धनंजय थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भारत बुळे तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डोंबिवलीतही उपमहापौर राहुल दामले यांनी मानपाडा रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त कांचन गायकवाड, सहा. आयुक्त जयराम शिंदे, प्रसाद ठाकूर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Scroll to Top