मुंबई-नाशिक महामार्गावर कासणे येथे उड्डाणपुलाची मागणी

अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा

येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील कासणे येथे ओव्हर ब्रीज बांधण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) उपतालुकाप्रमुख भगवान भोईर व सामाजिक कार्यकर्ते भास्कर भोईर यांनी केली आपरंतु हे ठिकाण रस्ता ओलांडताना त्रासदायक व धोक्याचे ठरत असल्याने या आवश्यक जागी ओव्हर ब्रीज व्हावा अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख भगवान भोईर व सामाजिक कार्यकर्ते भास्कर भोईर यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी येथे पहाणी केली असून ब्रीज बांधण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे भगवान भोईर यांनी सांगितले.हे. या मागची दखल न घेतल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला गेला आहे.

सध्या कासणे गावात वेअर हाऊसचे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. तसेच परिसरात अनेक ठिकाणी वेअरहाऊस आहेत. यामुळे वाहनांची रहदारी वाढलेली आहे. सदर, महामार्गावर अंडरपास (भुयारी मार्ग) नसल्याने जलद गतीच्या वाहनांमुळे स्थानिक रहिवाशी, कामगार, सामान्य नागरिक व विद्यार्थी यांना रस्ता ओलांडणे तसेच जवळच असलेल्या पेट्रोल पंपामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालक यांना धोका उत्पन्न होत आहे.

त्याचबरोबर या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडले असून या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे व अनेक व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्ग हे महामार्गाची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि स्थानिक वाहतूक अखंडित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. यामुळे महामार्गावरील वाहनांचा वेग अबाधित राहून स्थानिकांना रस्ता ओलांडणे किंवा शहरात, गावात प्रवेश करणे सोपे होते.

Scroll to Top