राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत आस्थाने पटकावली दोन कांस्यपदके

झारखंड येथे नुकत्याच झालेल्या १२ व्या खुल्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये कल्याणच्या आस्था नायकर हिने इनलाइन प्रकारामध्ये ५००० व १००० ट्रॅक मध्ये दोन कांस्यपदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली. या स्पर्धेमध्ये २२ राज्यातील १००० स्पर्धक सहभागी झाले होते. आस्था, सध्या डोंबिवलीच्या रॉयल कॉलेज मध्ये ११ वी सायन्स मध्ये शिकत असून तिने आत्तापर्यंत एक आंतरराष्ट्रीय आणि आठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. राष्ट्रीय स्पर्धेमधील या कामगिरीसाठी आस्था ला रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. पुष्पेंद्र सिंग व कोच प्राची घुमरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top