श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

येथील श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने विद्या विकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गेल्या २४ वर्षांपासून श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदती बरोबर आरोग्य शिबीर, दहिहंडी उत्सव, क्रीडा, सांस्कृतिक व विविध उपक्रम तसेच इतर गरजू व्यक्तींना मदतीचा हात असे अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर व छत्री वाटप करण्यात आले.

सदर, कार्यक्रमावेळी पोलिस निरीक्षक सुनील बच्छाव, विद्या विकास मंडळाचे चेअरमन राजेंद्र भेरे, सचिव रविंद्र शेलार, संचालक अनिल महाजन, मंडळाचे अध्यक्ष अनिल मानिवडे, जेष्ठ नागरिक अनंता शेलार, प्राचार्य वासुदेव भोईर, पर्यवेक्षक संजीव जाधव, श्रीराम मित्र मंडळाचे मार्गदर्शक पदाधिकारी महादेव वाढविंदे, दत्तात्रय देवरे, चंद्रकांत सोनार, शांतकुमार लच्छाणे, चिंतामण पवार, बी. के जाधव आदी जण उपस्थित होते.

दरम्यान, श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने सरस्वती विद्यालयातील जवळपास दिडशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून यापुढे परिसरातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून काही गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी साठी मंडळाच्या वतीने आर्थिक मदत केली जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अनिल मानिवडे यांनी म्हटले तर अमली पदार्थ पासून दूर रहा व चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे, आई-वडीलांचे नाव लौकीक करावे असे विचार पो. नि. सुनिल बच्छाव यांनी मांडले. तसेच विद्या विकास मंडळाचे चेअरमन राजेंद्र भेरे, सचिव रविंद्र शेलार, प्राचार्य वासुदेव भोईर व पर्यवेक्षक संजीव जाधव यांनी दरवर्षी उपक्रम हाती घेऊन गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करीत असलेल्या श्रीराम मंडळाचे आभार मानून मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक मुकेश दामोदरे यांनी केले तर यासाठी श्रीराम मित्र मंडळाचे मयुर शेलार, ऋषिकेश पांडव, श्यामराव पाटील, भूपेंद्र देवरे, ओमकार महाजन, चंद्रकांत बिडवी, पार्थ मानिवडे आदी पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले होते.

Scroll to Top