ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे आमदार माधवी नाईक यांचा सन्मान

ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे विधान परिषदेतील भाजपच्या आमदार ऍड. माधवी नाईक यांचा ऍड. विजय आगाशे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. आगामी काळात न्यायालयासंदर्भातील विविध प्रश्नांबरोबरच बार कौन्सिल आणि वकिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध राहीन, अशी भावना आमदार ऍड. माधवी नाईक यांनी व्यक्त केली.

ठाणे न्यायालयात अनेक वर्षांपासून वकील म्हणून माधवी संजय नाईक यांनी कार्य केले आहे. ठाणे महापालिकेच्या नगरसेवकपद याबरोबरच त्यांनी भारतीय जनता पार्टीच प्रदेश पातळीवर संघटनात्मक कार्य केले. त्यांची नुकतीच भाजपतर्फे विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ऍड. माधवी नाईक यांचा ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँण्ड गोवा’चे सदस्य गजानन चव्हाण, माजी उपमहापौर व ज्येष्ठ वकील सुभाष काळे, संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम यांच्यासह
मान्यवरांची उपस्थिती होती.

आमदारपदाच्या माध्यमातून भविष्यात अधिक जनसेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती सार्थ ठरविण्याचा माझा प्रयत्न असेल. विधी क्षेत्रातील वकील बंधू भगिनींकडून मिळालेला हा सन्मान यापुढील काळात मान्यवरांची उपस्थिती होती.

आमदारपदाच्या माध्यमातून भविष्यात अधिक जनसेवा करण्याची संधी मिळाली आहे. ती सार्थ ठरविण्याचा माझा प्रयत्न असेल. विधी क्षेत्रातील वकील बंधू-भगिनींकडून मिळालेला हा सन्मान यापुढील काळात माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरेल. वकिली क्षेत्रातील माझे गुरू ऍड. विजय आगाशे यांच्या हस्ते झालेला हा सन्मान मोठा गौरव आहे. त्यांच्याकडून केवळ वकिलीचेच नव्हे, तर शिस्त, प्रामाणिकपणा, कामाप्रती समर्पण असे अनेक संस्कार मिळाले. ते कायम प्रेरणादायक राहतील, अशी भावना आमदार ऍड. माधवी नाईक यांनी व्यक्त केली. बार कौन्सिल व जिल्हा वकील संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार नाईक यांनी दिले.

माझ्या उमेदीच्या वर्षात ठाणे जिल्हा न्यायालयात अनेक दिग्गज वकिलांचे काम जवळून पाहू शकले. त्यात दिवंगत प्रभाकर भाई हेगडे आणि दिवंगत रमाकांत अण्णा ओवळेकर ही नामवंत व्यक्तिमत्व होती. त्यांच्या कार्याचा कायम अभिमान राहील, अशी भावना आमदार ऍड. माधवी नाईक यांनी व्यक्त केली.

Scroll to Top