साने गुरुजी वाचनालय खारीगाव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्री. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून व विशेष सहकार्याने शैक्षणिक प्रोत्साहन कार्यक्रमा अंतर्गत तसेच जेष्ठ नेते दशरथ दादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना शिवसेनेचे उपशहरप्रमुख राकेश लीला दशरथ पाटील यांच्या पुढाकाराने खारीगांव आणि इतर परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक उमेश काशिनाथ पाटील, कळवा मुंब्रा विधानसभा महिला संघटक सौ. रचना राकेश पाटील, उपशहर प्रमुख नथू पाटील, विभागप्रमुख अरविंद सैतवडेकर, उपविभाग प्रमुख उल्हास हळदणकर, शाखाप्रमुख राधेय वराडकर, शाखाप्रमुख निशिकांत महाकाळ, मुख्याध्यापिका सौ. अश्विनी सोनवणे, शिक्षक व विद्यार्थी हे सर्व ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. रचना राकेश पाटील ह्यांनी डॉ.ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या उच्च विचारांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. अशा पद्धतीने हा मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम अतिशय आनंदात व मोठ्या उत्साहात पार पडला. ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल परिसरातील सर्व विद्यार्थी व पालकांनी ह्या वेळी आभार मानले.


