जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणेकरांची जोरदार निदर्शने
ठाणे : समाजसेवक सोनम वांगचूक
यांना दिल्ली पोलिसांनी ज्या पद्धतीने उपोषण स्थळावरुन उचलून नेले या कृतीबद्दल देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे. ठाणे शहरात ही या अटकेचे पडसाद उमटले असुन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक समविचारी संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. ठाणेकर नागरिक, तसेच तरुणाईचा यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
जंतरमंतरवर देशभरातील तरुणाई एकवटलेली आहे, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जातोय. नीट परिक्षा घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असताना सरकार ने SUPPOR उपोषणकर्त्यांशी संवाद साधण्या पेक्षा उपोषणास बसलेले सोनम वांगचुक यांना बळाचा वापर करत दवाखान्यात जबरदस्तीने नेतानाची संपुर्ण देशाने चित्र पाहिले त्यामुळे देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटणं सहाजिकच होतं. धर्मराज्य पक्षाचे नेते राजन राजे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेस शहर अध्यक्ष राहुल पिंगळे, रिपाई आठवले गटाचे भास्कर वाघमारे, शिवसेना उबाठा पक्षाचे केदार दिघे, समतावादी विचार शहारात बुलंद करणारे विचारवंत प्रा. संजय मं.गो., कायद्याने वागा चळवळीचे राज असरोंडकर, अंधश्रद्धा निर्मूलन संघटना असे बरेच सरकार विरोधी विचारांचे मान्यवर या आंदोलनात उपस्थित होते. तरुणांच्या हातात संविधान, बाबासाहेब व सोनम वांगचूक यांच्या प्रतिमा होत्या. सरकार विरोधी घोषणांनी कोर्ट नाका परिसर आंदोलकांनी दणाणून सोडला होता.
एक तरुणांच्या समुहाने पथनाट्य सादर केले तर काही आंदोलकांनी, सोनम वांगचुक यांना पोलिसांनी कसं दडपशाही करत उपोषण स्थळावरुन उचलून नेले हे नाट्य रुपात दाखवून निषेध व्यक्त केला. अनेक विचारवंत नागरिकांनीही स्वतः हुन या आंदोलनात सहभाग घेतला होता.


