कोकण विभाग पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक कल्याण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत ठाणे जिल्हा (शहर) कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या विस्तारासह पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण आणि संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर नियुक्त्त्या जाहीर करण्यात आल्या. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील होते. यावेळी कोकण विभाग अध्यक्ष जयेश शेलार पाटील, मुंबई विभाग अध्यक्ष रवींद्र देशमुख तसेच पालघर जिल्हाध्यक्ष अॅड. सिद्धार्थ सांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठाणे जिल्हा मुख्य कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संपादक विजय यादव यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार महादेव पंजाबी, सचिवपदी आनंद पद्मनाभन व प्रफुल केदारे, सहसचिवपदी करण शर्मा, तर कोषाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार गोपाल शर्मा यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून मीनल पवार, हरिप्रकाश तिवारी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. शहर कार्यकारिणीमध्ये संदीप शेंडगे यांची कल्याण शहर अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार शरद शहाणे यांची डोंबिवली शहर अध्यक्ष, सारिका शिंदे यांची डोंबिवली महिला पत्रकार अध्यक्षा, विद्या कुलकर्णी यांची उपाध्यक्षा, तर रामचंद्र खडपे यांची नवी मुंबई शहर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
कल्याण शहर कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष संदीप शेंडगे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र कांबळे, उपाध्यक्ष संभाजी आत्माराम मोरे, अजय शेलार, सुधीर लवांदे, नारायण सुरोशे, सहखजिनदार सचिन कानडे, सहसंघटक राहुल उघडे, सचिव जितेंद्र कानडे, संघटक दिनेश जयस्वाल, तानाजी लोणे, सहसचिव संजय भोराडे, सदस्य सुभाष शेंडगे, विनोद लोखंडे, साईनाथ ठाकरे आणि भगवान सुरळके यांची नियुक्ती करण्यात आली.


