अंबाडी तालुका मागणीसाठी कृती समितीचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

अध्यक्ष शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, श्रमजीवी संघटना,जिजाऊ संघटना, भूमिपुत्र एल्गार संघटना, शिवक्रांती प्रतिष्ठान मराडे पाडा, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनात अंबाडी तालुका कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष शरद पाटील यांनी केले. पदाधिकारी आर जी पाटील, सुदाम बाबाजी पाटील, एन वाय पाटील, मोहन पाटील, आत्माराम पाटील, केशव लाटे प्रमुख संघटक नवसु पाटील, विजय गायकवाड, श्याम भोईर, संतोष पाटील, अजय तनपुरे, कल्पेश जाधव, किशोर जाधव, कॉम्रेड रमेश जाधव, केशव लाटे, मनसे तालुकाध्यक्ष विकास जाधव, भूमिपुत्र एल्गार संघटनेचे संस्थापक प्रमोद पवार यांसह पंचक्रोशीतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

Scroll to Top