टीईटी पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपीसह साथीदारास अटक

एकूण १४ आरोपींना आतापर्यंत अटक

आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता याचे आग्रा येथील महीम पत्रण या छापखान्यातील कर्मचाऱ्यांसोबत आर्थिक हितसंबंध होते. ज्या ज्या वेळेस महत्त्वाचे पेपर या छापण्यात छापण्यासाठी येत असत त्या त्या वेळेस ठराविक रक्कम ठरवून मुख्य आरोपी विजेंद्र कुमार गुप्ता हा छापखाण्यातील कर्मचाऱ्यांकडून पेपर विकत घेत असत. पेपर विकत घेताना कर्मचाऱ्यांना पैसे व इतर आमिष दाखविण्यात येत असल्याची माहिती देखील पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी या पत्रकार परिषदेत दिली असून या प्रकरणात आणखी इतरही आरोपी असण्याची शक्यता पोलोसांनी वर्तविली आहे.

आरोपींनी हे पेपर नेमकी कुणाला व कितीला विकले ते कुठे कुठे विकले याचा तपास होणे बाकी असून सखोल तपासानंतर हि माहिती समोर येणार असून आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांनी दिली आहे.

Scroll to Top