बीएलओ भेटीच्या एसआयआर विशेष कॅम्पला मतदारांचा उत्तम प्रतिसाद

सबलीकरणासाठी लोकशाहीच्या असलेले मतदानाचे महत्व ओळखून नवी मुंबईकर नागरिकांचा एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासास चांगला प्रतिसाद मिळत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ऐरोली व बेलापूर या दोन्ही मतदारसंघात नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवार या सुट्टयांच्या दिवशी आयोजित बीएलओ भेटीच्या विशेष कॅम्पला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मतदारयादी पुनर्निरीक्षणाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात नागरिकांनी कर्तव्यभावनेने सहभाग घेतला.

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली दि. २४ जुलै रोजी रात्री ८ वा. पासून २७ जुलै रोजी सकाळी १०.०० वा. पर्यंत २ दिवसात विशेष कॅम्पमध्ये ४१७७५ मतदारांना गणनापत्र (Enumeration Form) दोन प्रतींमध्ये वितरित करण्यात आले तसेच ४३३२८ नागरिकांच्या गणनापत्रांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले. आत्तापर्यंत ६,७१,२६४ मतदारांना गणनापत्र (Enumeration Form) दोन प्रतींमध्ये वितरित करण्यात आले असून २,७२,४२० नागरिकांच्या गणनापत्रांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे.

यामध्ये १५० ऐरोली मतदार नोंदणी अधिकारी प्रिती पाटील यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली मतदारसंघात २ दिवसात ८० हून अधिक ठिकाणी झालेल्या विशेष कॅम्पमध्ये २५६८७ नागरिकांना गणनापत्रे (Enumeration Form) वितरित करण्यात आली तसेच २१९२० नागरिकांच्या गणनापत्रांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले. तसेच आत्तापर्यंत ३,४७,८३३ मतदारांना गणनापत्र (Enumeration Form) दोन प्रतींमध्ये वितरित करण्यात आले असून १,३४,७२७नागरिकांच्या गणनापत्रांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे.

Scroll to Top