वासिंद मधील चोरी घटनेतील दोन आरोपींना अटक

शहरात दोन ठिकाणी झालेल्या चोरी मधील घटनेतील दोन आरोपींना वासिंद पोलिसांनी नवी मुंबई येथील गुन्हे शाखा – १ पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. दिनांक 14 मे 26 रोजी शहरातील पूर्व भागात स्वामी विवेकानंद नगरमधील गुरूकृपा निवास प्लॉट येथे व पश्चिम कडील श्रीराम नगरमधील तुळजाई सेरेनिटी गृह संकुलात अशा दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी केलेली होती. सदर दोन्ही ठिकाणचे चोरी मध्ये एकूण 124 ग्रॅम सोन्याचे, 255 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम असे चोरीला गेलेले होते. याबाबत वासिंद पोलिस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली होती. या गुन्ह्याचा तपास वासिंद पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी करीत असताना त्यांनी नवी मुंबई येथील गुन्हे शाखा -1 पोलिसांच्या मदतीने या चोरी प्रकरणी युसुफ रशिद शेख (वय-42) रा. वाशी व नौशाद मुस्ताक अलम (वय-32) रा. नवीमुंबई या दोन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे तसेच त्याच चोरट्यांनी नवी मुंबई येथे देखील चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तर सदर, आरोपीतांना नवी मुंबई तळोजा जेल येथून ट्रान्सफर करून 22 जुलै रोजी अटक केली व त्यांना दि. 03 ऑगस्ट रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्यांच्या कडून चोरीतील 124 ग्रॅम सोन्याचे दागिने पैकी 80 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 150 ग्रॅम चांदीचे दागिने पैकी 110 ग्रॅम चांदीचे दागिने तसेच 105 ग्रॅम चांदीचे दागिने पैकी 105 ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव व पो.उप.नि. योगेश ढिकले यांनी दिली आहे. सदर, कारवाई, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल, पो.उपविभागीय अधिकारी विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील बच्छाव, पो.उप.नि. योगेश ढिकले, महिला पो.उप.नि. माधुरी भुरेवार, वरिष्ठ पो.ह. युवराज चव्हाण, पो.ना. अनिल राठोड, पो.ह. गुरुनाथ पडवळ, अक्तर तडवी, रविंद्र पवार, नितीन उगले, सचिन मुंढे आदी पथकांनी केली आहे.

Scroll to Top